Wednesday, 10 June 2020

शाळा आणि शिक्षण पद्धती

शाळा आणि शिक्षण पद्धती

वयाच्या ५व्या वर्षीच  आपण आपला  घराबाहेरचा  प्रवास सुरु करतो आणि सुरवात होते ती शाळेपासून........

आजची आणि पूर्वीची शिक्षण प्रणाली हि खूप वेगळी होती. आम्हाला वर्षाला ४ परीक्षा असायच्या, त्यातील २ चाचणी आणि १ सहामाही आणि  १ वार्षिक. त्या सगळ्या परीक्षांची सरासरी म्हणजे आमचा वार्षिक result. खूप अभ्यास करावा लागायचा, पुस्तकात धडे पण खूप असायचेत. शाळेत कळलं नाही तर दुसरा पर्याय म्हणजे ट्युशन क्लास. आमच्यावेळी शाळेत मुलांचं वर्गीकरण त्यांच्या हुशारीवर व्ह्यायच म्हणजे खूप हुशार मुलं हि "अ " वर्गात आणि असं करत शेवटचा वर्ग हा "फ "असायचा. नववी आणि  दहावीत "अ" वर्गाला शाळेशिवाय एक्सट्रा classes असायचेत. ह्याच पद्धतीमुळे  इतर मुलांच्यात आत्मविश्वास कमी असायचा कारण त्यांना कोणी Motivate करणार नव्हत. हे सगळे मी माझ्या अनुभवातून सांगते. 

पण आत्ताच्या मुलांना शाळा सोडून इतर पर्याय मिळालेत अभ्यासाचे,  Youtube, एडुकेशनल अँप्स आहेत. कळलं नाही तर ते पुन्हा पुन्हा बघून शिकू शकतात त्यांचा अभ्यासक्रम पण आमच्या तुलनेत कमी आहे कारण त्यांना प्रोजेक्ट वर्क, Weekly Test असतात म्हणून  त्यांना मार्क मिळवणे सोपं जातं. अलीकडे मी बऱयाच मराठी शाळामध्ये पाहिलंय की अभ्यासात कमी असणाऱ्या मुलांचा वेगळा वर्ग केला जातो आणि त्यांच्यावर  अधिक लक्ष दिला जातं. हा मात्र फार मोठा फरक आहे. 

मला असा वाटतं कि सगळ्या शाळेमधून अशा काही टेस्ट घ्यायला हव्यात, त्यात प्रत्येक मुलांची आवड, रुची कशात आहे हे कळलं पाहिजे कारण प्रत्येकामध्ये काही ना काहींत तरी गुण असतातच. नेहमी पेक्षा वेगळी शाळा  असावी. मुले आवडीने शाळेत गेली पाहिजे. शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा  संवाद असायला पाहिजे तो अजूनही नाही,  काही शाळेत असेलही पण साध्या  शाळेत कमी प्रमाणात आहे. 

माझ्या पूर्ण शिक्षणातून मला असा वाटत कि माणूस स्वतःच्या आवडीचं काम खूप मन लावून करतो आणि शाळेतच जर आपण ह्या पिढीला त्यांचे गुण दाखवले तर एक प्रत्येक तरुण आवडीने शाळेत जाईल पण आपण ती मुभा महाविद्यालयीन शिक्षणात दिली  choose  your own stream which is  also  limited.



                                                                        




No comments:

Post a Comment

What are the Rules of Intermittent Fasting ?

Everyone has a question that what are the rules of  Intermittent Fasting !! There are some rules to follow for Intermittent Fastin...