गेल्या दहा दिवसापासून एक बातमी आपल्या मनाला चटका लावते ती म्हणजे सुशांत सिंग राजपूत ची आत्महत्या खरंच दुःखद घटना :(
गेल्या रविवारी हि बातमी ऐकली आणि shock लागला , मनात विचार आला त्याच्या कडे सगळं काही होत तरी त्याने का केली असेल आत्महत्या ? त्याच्या जाण्यानंतर जे काही चालू आहे त्यावरून अस वाटू लागू लागलय कि इतर लोकं स्वतःची पोळी भाजून घेतात , खरंच किती जणांना दुःख झालय त्याच्या जाण्याने हे देवालाचं माहिती........
Nepotism हा शब्द सामान्य लोकांनी ह्या सिनेतारकांकडूनचं ऐकलाय . Nepotism म्हणजे आपल्या लोकांना कामाची संधी देणं , त्यांना पाठिंबा देणं वगैरे आणि ह्या न्युजचॅनेल ह्या सगळ्याची बातमी केली स्वतःच्या फायद्यासाठी. मला सांगा प्रत्येक माणूस हा आपल्या लोकांना पहिली संधी देणार, बरेच असे कलाकार आहेत ज्यांचं कोणीही ह्या क्षेत्रात नसताना स्वतःच्या कुवतीवर प्रसिद्ध झालेत. त्यांनीही हे सहन केला असेल ना , मग आताच का त्याचा बाऊ होतोय ?
सुशांत डिप्रेशन मध्ये होता त्याने आत्महत्या केली, पण देशात रोज लोकं आत्महत्या करत असतील त्या कधी ह्या न्यूज चॅनेल वाल्याना दिसल्याच नाहीत , शेतकरी , कॉर्पोरेट मध्ये काम करणारा , व्यवसाय करणारा सुद्धा.
मी HR आहे एका नामवंत कंपनीत , गेली दहा वर्ष मी ह्या क्षेत्रात काम करते, प्रत्येक वर्षी आम्हाला नव्याने स्वतःला सिद्ध करावं लागत , तुम्ही मागायचा वर्षी खूप चांगल काम केलं म्हणून ह्या वर्षी काहीच करावं लागणार नाही असा नाही. त्यात अचानक आपले सिनिअर्स कोण दुसऱ्याला संधी देतात. एवढं काम खूप काम करूनही , टार्गेट अचिएव्हड करूनही काहीच मिळत नाही ना तेव्हा लोक डिप्रेशन मध्ये जातात, फार राग येतो कंपनीचा आणि स्वतःचा मग पुन्हा नव्याने उभं राहतात पुन्हा आपल काम करायला सुरवात करतात . शेतकरी पण बघा ना तो त्याचे कधीही प्रयत्न सोडत नाही मग काहीही हो
इथं मुद्दा हा आहे कि सुशांत मनाने खूप खचला होता त्याला मानसिक आजार झाला होता आणि मनाला खंभीर बनवण्याची क्षमता संपली होती म्हणून त्याने हे पाऊल उचलल , सगळ्या क्षेत्रातले लोक हे सहन करतात , मनाला पुन्हा समजावतात आणि पुन्हा आपल्या कामाला लागतात.